शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

बाप अन बाप वरल्ह्या कविता






पाठराखण

 

            हा कविता संग्रह जरी मी माझ्या अहिराणी बोलीतून भाषांतरीत केला असला तरी पाठराखणपर हे दोन शब्द मी मराठीतून मुद्दाम देत आहे. वाचकांना या कविता संग्रहातील कवितांचे काय म्हणणे आहे तो आशय तरी कळावा यासाठीच ! पुस्तकाच्या शेवटी प्रत्येक कवितेतील अहिराणी शब्दांचा कवितेचा क्रमांक नाव देवून मराठीतून अर्थ दिला आहे. मी काही कवितांचे अलिंकारिक असे परिक्षण वा समिक्षा केलेली नाही.   दोन चार वेळा या कविता वाचतांना, त्यांचे अहिराणी बोलीतून भाषांतर करतांना जे जाणवले तेच मांडले आहे.  उद्देश हा की अहिराणी भाषांतरही कळावे मूळ मराठी कविता संग्रह वाचण्यासाठी वाचकांनी वळावे !  या संग्रहात केवळ बापावरील कवितांच घेतल्या आहेत इतर कविता घेतलेल्या नाहीत.  एक मात्र नक्की ज्याला मराठी किंवा अहिराणी वाचता येते तो या कविता वाचतांना अनेक वेळा आपले डबडबलेले डोळे पुसल्या शिवाय पुढचे पान वाचूच शकत नाही !

            काही दिवसापूर्वी पाचोरा तालुक्यातील गिरड या गावी  श्री  रमेश धनगर या एका शाळा शिक्षकाने खूप सुदंर असा कार्यक्रम आयोजित केला होता  हा अहिरबोली या चॅनेलच्या माध्यमातून एक अहिराणी बोलीची चळवळ चालविणारे म्हणून नाव लौकीक असलेला हा शिक्षक.  या शिक्षकाने आपल्या पित्याच्या पुण्यस्मरणा निमित्ताने शाळेत हा कार्यक्रम आयोजित केलेला होता.  अन या कार्यक्राचे अध्यक्ष होते अंमळनेरचे कवि रमेश पवार.  येागायोगाने या कार्यक्रमात आमची पहिलीच भेट अन ओळख.  श्री  रमेश पवार हे बापावरील दर्जेदार कविता लिहिणारे एक प्रमुख कवि म्हणून मराठी कवितेच्या विश्वात ओळखले जातात.  याच कार्यक्रमात त्यांनी मला त्यांचा  ''गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ'' हा कविता संग्रहभेट म्हणून दिला.  मी तसा कवितेचा रसिक किंवा अभ्यासकही नाही.  मात्र घरी आल्यावर तो कविता संग्रह चाळला.  पुन्हा पुन्हा वाचावा वाटला . वाचला.  प्रत्येक कवितेत काही तरी ताकद आहे हे जाणवलं.  एक दोन कविता मी सहज अहिराणीतून भाषांतर करुन व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला.  त्या -याच लोकांना भावल्या  अनेकांनी प्रतिक्रियाही नोंदविल्यात.

            एक तर या बापावरील कविता लिहिणा-या या कविता संग्रहाचा कवि ज्या कार्यक्रमाला लाभला तो कार्यक्रमही वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थच आयोजित केलेला होता.   मला हा कविता संग्रह पुन्हा पुन्हा वाचावा वाटला, तेा अहिराणी बोलीतून भाषांतरित करावा वाटला.  अन हे वाटनं एकदाचच नव्हतं तर पुन्हा पुन्हा वाटणारं होतं.  कदाचित मला वडील काय असतात हे प्रथमच या कवितेतून कळालं असावं ! माझे वडील मी दोन वर्षाचा असतांनाच वारले होते.  त्यामुळे वडील , वडीलांचे प्रेम, वडीलांशी केलेली मस्ती, त्यांच्या खाद्यावर बसून गावभर फिरणे, त्यांच्या सोबत भांडून आपले हट्ट पूर्ण करुन घेणे हे काय असते, ते मला माहितच नव्हते.  त्या मुळे वडील अन मुल यांचे भावनिक संबंध काय असतात ?  या पासून मी कोसो दूरच होतेा  बालपन मामा-मामी कडेच गेलेले  आईही वडीलांच्या मृत्यू नंतर भावांकडेच राहिलेली.  त्यामुळे बाप काय असतो अन बापाची भावंडे , काका , आजोबा काय असतात ? हे कळलेच नाही. शिक्षणामुळे नोकरी करणा-या मामांकडेच राहणे झाल्यामुळे आई पासूनही तसा दुरावलेलोच.  विशेषतः मामीच्याच हाताखाली बालपन गेल्याने आई वडील यांचं प्रेम, हट्टं, बालपण या बाबी जीवनात आल्याच नाहीत. कदाचित यामुळेच रमेश पवार यांची बापावरील प्रत्येक कविता मला अधिक आकर्षीत करित राहिली असावी.  अन मी या कवितेत रुतत गेलो . सा-या कवितांचे अहिराणी बोलीतून स्वच्छेने अन सहज उस्फूर्त असं भाषांतर माझे हातून कळत होवूनही गेलं.

            रमेश  पवार यांच्या ४०/४२ कवितां  या संग्रहात आहेत.  प्रत्येक कवितेवर भरभरुन असंच लिहिण्यासारखं आहे.  बाप हा केवळ माणूस नसतो, पोसिंदा नसतो, तर ते एक विद्यापिठ असते, बाप हा देवच असतो ! मुलांसाठी अन कुटूंबासाठीही ! एक जटील असं ते रसायन वा कोढंही असतं, उकलता येणारं !   समजणारं !

            पहिलीच कविता - जतरा - जत्रा हा शब्द आपणाला केवळ यात्रा, बाजार या अर्थाने माहित आहे.  खांद्यावर बसून शेजारच गावातील यात्रा बघण्याची आपली हौस केवळ बापच पुरी करु शकतो.  अहिराणी बोलीत जत्रा हा शब्द यात्रे साठी तर वापरतातच त्या शिवाय तो अंत्ययात्रेसाठीही वापरतात.  ज्या बापाने खाद्यावर बसवून आनंदमयी अशी यात्रा फिरवून आणली त्याच बापाला आज खांद्यावरुन स्मशानात नेतांनाची ही यात्रा जीवाला चटका लावणारी ठरते.  कवि बापाला विठ्ठलातही पाहातेा.  तो विठ्ठल थंडगार गाभा-यात अन बाप घामाने डबडबलेला, शेताच्या बांधावर, बेमौसमी पावसाशी झगडतांना पाहून कवि, बापावरच अभंग लिहीण्याचे त्याचीच पुजा करण्याचे ठरवितो

            बापाला खाद्यावरुन स्मशानात नेण्याच्या स्मृती कविला अनेक कवितामधून सतत अस्वस्थ करतांना दिसतात.  या कविसाठी बापाला अग्निडाग देतांना बालपनीच्या बापाकडे हिवाळ्यात काडी काडी गोळा करुन शेकोटी पेटविण्याचा हट्ट धरण्याची स्मृती जिव्हाळी बनते.  बाप गेल्या नंतर आबाळ झालेल्या घराची, आईची, भावंडाचीं एक एक गरज पूर्ण करुनही कविला खंत आहे ती ही की, आपणाला  राब राब राबतांना बापाच्या पायांना पडलेल्या भेगा काही बुजवता आल्या नाहीत याची.  कविला खंत आहे ती ही की, बापाचं राबनं हे बैलांच्या राबण्यासारख कुणीही आजवर मोजलेलं नाही.  निसर्ग अन सरकार दोघेही त्याला छळतच राहतात. अन विठ्ठलही कमरेवरचे हात काही सोडीत नाही !

            सतत खंबीर असणारा बाप रडतांना कधिही दिसलेला नाही. मात्र बापाच्या आंतरिक वेदना कविला, भर झोपेत बाप जेव्हा कन्हत असतो तेव्हा जाणवतात.  बाप आपलं रडणं, दुःख व्यक्त करण्याचा हा मार्ग निवडतो तर ! बापाच्या या शरिराने आयष्यभर उनवारा, बेमौसमी पाउस, सरकारी धोरण यांचे सारे सारे चटके सहन केलेतं अन आता पुन्हा मेल्यावर ही या चितेची आग !

            कवि, बापाच्या भावविश्वात ऐवढा मिसळून गेला आहे की बाप अन निसर्ग यातील सीमारेषाही पुसट होतांना आढळतात.  बाप हा झाडा सारखा सर्वाना सावली देणारा, आश्रय देणारा, आधार देणारा.  चिमण्यापाखरे  खोपा करतात , मौज मजा करतात मात्र ते झाड सुकत चाललं हे समजतात पाखरे उडून जातात.  बापाच्या जीवावर हौस मौज करणारी ही पाखर सुद्धा बाप थकल्यावर असच करतात का ? मात्र तरीही झाड अन बाप आपली माया संपू देत नाही.  या झाडाने वाळून गेल्यावरही संसारासाठी आवश्यक असे अर्धी लाकडे सरपन म्हणून तर अर्धी चितेसाठी म्हणून दिलीतच ना !

            हल्लीची पिढी ही, बाप या संकल्पनेपासून कशी दुरावत चालली हे ही कवि आपल्या काही 'खे ' किंवा 'पित्तर'' या सारख्या कवितेतून मांडतांना दिसतो.  बापाला दम्याची उबळ येतांच टिव्ही वरील क्रिकेटचा ऐन रंगात आलेला खेळ सोडून बापाच्या पाठीवरुन हात फिरवायला धावणारा आणि उबळ गेल्यावर शांत झोपी गेलेला बाप पाहून खेळी जिंकल्याच्या आनंदात जगणारा हा कवि . पण या कवीच्याही मनात पुढील पिढीच्या वर्तना बाबत शंकेची पाल चुकचूकते,  आपल्याला दम्याची उबळ आल्यावर जाईल का आपला आवाज मुलांपर्यत ?  की, टिव्हीच्या खेळांच्या कल्लोळात आपणच शांत होवू ? आजच्या मुलासाठी श्राद्ध ही एक केवळ इव्हन्ट झालेली आहे, सारं सारं सामान बाजारातून विकत आणतांना बायकोला भांडी धुण्याचे कष्ट नकोत म्हणून काळजी घेत जेवणासाठी केळीची पाने सुद्धा आणणारा नवरा, बाप मेल्यावर आज श्राद्धासाठी सिगारेट, दारु, मिठाई आणणारा आजचा मुलगा अन आजची ही सून, मात्र काल बाप जीवंत असतांना विचित्र वागणारी ही सारी मंडळी मन सुन्न करते.  बापाला भेटायला येतांना जवळ थोडा वेळ बसण्या ऐवजी केवळ घड्याळ भेट म्हणून आणणारा मुलगा ! हे समाजातील बदललेलं चित्र,कवी शब्दबद्ध करतो  आजही बापाचं कन्हत, खाटेवर पडून रहाणं समजून घ्यावयाचे असेल तर आपल्याला ऑफिसमधून थकून आल्यावर आपल्या कन्हण्याने शांतपणे टिव्हीची मालिका बघण्यात ज्याला अडथळा वाटतो, त्या मुलाला समजून घ्यावं लागेल, त्यासाठी केवळ बाप बनूनही ते चालणारं नाही, हेही कवि सांगतो,  पिढी बदलली आहे,  बाप समजावून सांगतांना आपल्याला कधी कधी चापटीही मारायचा मात्र आता आजच्या बापांची हिंमत नाही होत मुलाला चापटी मारायची ! भीती वाटते, तोच कदाचित उगारेल हात म्हणून ! त्यामुळे पुढील पिढीला बापही समजावून सांगणे थोडे कठिणच आहे

            कवि केवळ आपल्याच नजरेतून दिसणारा बाप मांडतांना दिसत नाही तर ब-याच कवितेतून मुलीच्या नजरेतून, आईच्या नजरेतून दिसणारा बापही मांडतांना दिसतो  हट्ट पुरा करता करता बापाचं मायेनं गोंजारणं, ही काही आईच्या अंगाई गीतांहून कमी नाही.  मुलाच्या यशातच बापाला आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याच वाटतं असतं. हे आपल्याला ''जीवान मास्तर झाया'' मधून कळते.  बाप सुद्धा चुलीजवळील भाकरीच पोपड्या सारखा अभिमानाने फुगतो, खूष होतेा  कविच्या कवितेतील शब्द, संकल्पना, वेदना, अनूभव, माया , प्रेम, नाते संबंध हे सारं सारं आपल्या बोलीत, कृषिसंस्कृतीत रुजलेलें पावलोपावली जाणवते.  म्हणूनच तर बाप गेल्याचं दुःख गोठ्यातल्या हंबरणा-या गायीला अन बापासोबतच प्राण सोडणा-या बैलालाही आहे. बैलाला कधिही मारणारा बापाने एखादा चाबकाचा फटका मारलाच असेल तरी रात्री बाप त्या बैलाच्या पाठीवर मायेने हात फिरवितांना अन बैल बापाच्या हातालाही आपल्या खरबरीत जिभने चाटतांना   हा बैल या कविच्या कवितेतून पहायला मिळतो.  अन तसलच दुःख ओसरीवर दाणे टिपणा-या चिमणपाखरांना आहे.  ऐवढच नाही तर बांधावरल्या आंब्याच्या झाडालाही आहे.  एकढच नाही तर बाप मेल्यावर चितेला आग लावल्यावरही केवळ वरवरचे  रॉकेल,पेट्रोल, मीठ, हे जळाले, लाकडं जळतच नव्हती ! ती तरी कशी जाळतील या बापाला ? ज्याने ते झाड लावलं होतं अन त्याची ती लाकडं होती.  त्यांना सुद्धा कसं सहन होईल बरं या बापाचं मरण ? पुढे कविच सांगतो, ही लाकडं अन ज्वालाही निमित्त मात्र होती.  बाप तर आधीच उन्हानेच भाजून, जळून गेला होता. राबतांना या उन्हाने बाप गेल्यावर घर सूनं पडनं, मायेचं कपाळ उघड पडनं,  देवा शिवाय, दिव्या शिवाय देव्हारा असनं असं सारे सारे पोरके होतात हेच सांगतं.  कन्यादान तरी कोण करणार ? नाती गोती भाउबंद ही सारी वरवरची नाती !  हे सारे दुःख कवि समर्थ्पणे आपल्या प्रत्येक कवितेतून मांडतांना दिसतो.  बापाचं हे दुःख प्रत्येकालाच असतं . मात्र ते शब्दात पकडनं केवळ या सारख्या एखाद्या कविलाच शक्य होतं.

            बापाचं अचानक निघून जाणं कवीला अस्वस्थ करतं.  बापाचा जाण्याचा दिवस , त्या दिवशी केलेली प्रत्येक कृती, जशी , प्रेतांला मांडी देणं, तोडात शीप टाकनं, प्रेताला अग्नी देणं हे सारं सारं कवि शब्दबध्द करतो. बापाकडून जे जे मिळालं अन जे जे मिळण्याचं राहून गेलं ते ते तो आपल्या पोराला देण्याचा प्रयत्नही करतो.  बापाची कोपरी झेंड्यासारखी जपून ठेवणं, अन तसाच सल्ला तो पोरालाही देवून ठेवतो . राबणा-या , घामेजलेल्या बापाला तो शेतात पाहतो, बापला तो डोळ्यात पहातो  बापाला तो शाळेतही विसरत नाही  बापाची मया ही सातासमुद्राहूनही विशाल आहे हे ही तो आपल्या गरुजीना पटवून देतो  म्हणूनच तर पोरीला लग्न लावून सासरी पाठविणारा गुरुजीही आपले डोळे पुसतांना दिसतो  अन हा कवि  अभिमानाने सांगतो की त्याचा कोणत्याही ज्योतिष्यावर विश्वास नाही.  जो आहे तो बापाच्या कष्टांवर, बापाने दिलेल्या कष्टांच्या शिकवणीवर !

             बापाला आई सारखी गर्भधारणा अन गर्भापनाच्या वेदना नसतील होत,  मात्र त्याच्या वेदना हा 'वानकया ' म्हणजे दिसणा-या अशा सुप्त्‍वेदना असतात.  बाप गेल्यावर आई सातजन्म ज्या मंत्राने त्याच बापाला मागते, तोच मंत्र कविलाही तोच बाप सात जन्म मिळविण्यासाठी हवा आहे. बापाला आई सारख्ं दुःख व्यक्त करता येत नाही , अन दुःख व्यक्त करायला त्याला कुठे जागाही नसते.  आई  माहेरी जावून दुःख व्यक्त करु शकते .  मात्र बापाला कुठेही जाता येत नाही.  तो राब राब राबण्यातच असतो.  तो बापाला काही तरी सुख देता यावं म्हणून देवाकडे तोच बाप अन स्वतः तेच आकाश बनवण्याची मागणी करतो ! ती का ? तर  बदाबदा पाउन पडून त्याला बापाची शेती फूलवायची, बापाला दुबारा पेरणीच्या दुःखातून काहीसं दूर करावयाचे आहे.  गावाकडे सुटीवर आल्यावर बापाचा उत्साह, बापाचं सोबत शेतात घेउन जाणं, पारावरच्या गोष्टी सांगणं अन सुटी संपल्यावर बस मध्ये बसतांना निरोप देतांना हात हलवनं अन तेव्हा त्या हाताची सद--याची फाटलेली बाही संपूर्ण प्रवासात  कविला अस्वस्थ करनं,  या सारख्या बारिक सारिक बाबीचं वर्णन करुन शब्दचित्र उभे करण्याची कविची ताकद ही वाखाणण्या जोगी तर आहेच .  बापाच्या आयुष्यभराच्या कष्टांचे काळजावरील घाव बापाच्या तुटक्या चपलावरुन कळण्यासाठी असे कवीमन लागते.  अन याच कवीमनामुळे कार्यालयात एसीत बसूनही सा-या निपटारा काढण्यासाठीच्या दुष्काळाच्या फायली अश्रूंनी ओल्या होतात !

             माय ही केवळ आपलीच माय नसते. तर कधकधी बापाचही माय बनते .बापाला डोळे  पुसायला पदरच नसतो . उतारवयात जीवनभराच्या दुः,खाच्या आठवणींनी ओले डोळे तिच्याच पदराने पुसाणारा बाप हा कळणारा नाहीच !

            अन मग शेवटी आईच समजावून सांगते की, बाप समजून घेणं अन समजावून सांगणे जरा अवघडचं असते . बापाचं दुःख,कष्ट हे कोणत्याही विज्ञानाच्या मोजपट्टीने मोजताच येत  नाही ! ते एक स्वतंत्र असं दुःखाच शास्त्र आहे ! अन बाप हा बापच असतो  त्यांला दुसरा शब्दही नाही !

अभ्यासिका                                            डॉ.  रमेश सूर्यवंशी

कन्नड जि औरंगाबाद                            संपर्क -८४४६४३२२१८



बाप अन बापवरल्या कविता

- जतरा                                                         २२वाट

- वारकरी                                                      २३- पूजा

- आक्ती                                                       २४ - माय माहेर

- भेगा                                                                         २५ - श्रद्धांजली

- बाप                                                           २६साया

- हाई नैतं ते                                          २७बैसाखी उन

एकच दूक सलत -हायनं                            २८ - आभाय

- एरंडोली                                                     २९ - कन्यादान

- खे                                                           ३० - कालाबूला जीव

१०- बाप नावनी गोट                                      ३१ - ठाक

११- बापना जीवान मास्तर झाया !                     ३२ - पंचनामा

१२ - मयाना हात                                           ३३- पित्तरं 

१३कोपरी                                                    ३४अजिंठा  येरुई मन्हा घर !

१४ - सवाल                                                    ३५- घडाय

१५ - भाग                                                       ३६- पल्हो

१६- मन्हा पांडूरंग                                         ३७आवघड व्हस

१७ - बापसाटे                                                 ३८- कदानचीत

१८- बाप अन बैल                                          ३९- बाप जावावर

१९- बाप अन आंबानं झाड                            ४० - बाप गया   बापना वाटे  

२० - बाप अन आंन्डोर                                  ४१ - बाप गया त्या दीन

२१गरभपिशी अन बाप                            ४२ - बाप एक दूकनं शास्तर

 

 

 

 

- जतरा

 

धाकलपने

खांदावर बठाडी

ल्ही जाये

जोगेना गावले

खंडोबानी जतरा दखाडाले

 

आज बाप गया !

मन्हा खांदावरथाईन

चाल्हनी तेन्ही जत्रा

 

बापना सरतनवरच

बई गई मन्ही

धाकलपननी जत्रा   !

 

---०००---

                         

 

                                    - वारकरी

 

पंढरीना पांडूरंग

पैल्ह्यांदांवच

मी तुन्हं दरसन ल्हिदं

अन कायासावया रुपम्हा

 बापनं रुप दखं

 

तु तं हारमोतीस्मा सजेल,

फुलेस्मान मढायेल

गुलाल बुक्कामां न्हायेल

हासीखूसी लोकेस्ना Aदीमांन !

 

फरक आवढाच  

जगना पोसिंदा मन्हा बाप

वावरना मेंडवर एकठाच

डोयामां आभाय भरीसन

कव्हय बेमौसम, बेमुर्वत

पानीसंगे झगडतांना !

 

तुन्हा तं थंडागार गभारा  

अन तेन्हा

उनन्या झया सोसत सोसत

काया ठिक्कर पडेल आंगवर

घामन्या धारा !

तुले कसं सांगवा बापनं ग- हानं

पव्हचत नै मन्ही हाक

या काव कावम्हा

तू  नै सोडत पंढरी कधीच

अन येत नै

बापना वावरम्हा !

 

माप कर इठोबा

बाच् मन्हा इठोबा

मी पुंजसू तेलेच

अन लिखसू तेन्हाच अभंग

मी कर्नार नै वारी पंढरीनी

बाऽच मन्हा इठठल

अन मी तेन्हा

वारकरी !

--०००---

                          

                                     

- आक्ती

 

कितला तरास दिवूत

बापले धाकलपने !

आक्ती चेटाड ! आक्ती चेडाड !

म्हनीसन  

बाप काडी काडी गोया करे

अन आक्ती चेटाडे

मन हारकी जाये !

 

आते बाप गया

तेले सरतनवर ठेवं

अन डाग दिधा

आन धाक्लपननी याद

जीव्हाई लागनी

      

 

                - भेगा

 

       पोतारी पोतारी

पोपडा धरेल भिती

गयकं सप्पर अन खाले

वल्ला व्हयेल चुल्हा

धाक्ला नी बाही फाटेल कुडची अन

मायन ठिगय लायेल दांड भरेल लुगडं

जमीनले अन

तीन्हा नांगरट मां बापना पायले

पडेल रक्तायेल भेगा 

 

आसं घरभर

फैली पडेल  मन्हीं दैना

सांदी हायनू , हायातीभर

 

सांदी Åहायनू

भितीस्ना पोपडा

 

संगमरमरना दघडघाई

अन धाक्लानी कुडचीनी पौची

 

अन मायनं दांडी भरेल लुगडानं ठिगय

शीईऽ टाकं मी सारं दूक अन नादारीनी

मखरननी किनार

अन करी टाकी

 

मज्यानी भरजरी चादर

 

मी तं सांधी टाकं सम्दं

पन माप कर

जलम देनारा  आयबा

 

नै सांधता उन्यात

माले तुन्ह्या पायन्या भेगा !

---०००---  

                                                 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- बाप

 

बैल राबे रानमां

तसा राबे मन्हा बाप

तेन्हां दूकनं

केान्ही नै कयं मोजमाप !

 

तेन्हं आटेल रंगत

अन कोल्डा पोपडा

कंबर म्हा वाकेल

हाडेस्ना सापडा

 

गाये थेंब थेब घाम

तव्हे पिके शिवार

तो सारं जगना पोसिंदा

अन तेले कोल्डी भाकर

 

सारा रुतू बेइमान

तेले बायत Åहायेत

अन सरकार तेले

छयत Åहाये 

 

सोड एकदाव पंढरी

अैेकासाटे तेन्ही कुरबूरी

तुन्हा कंबरवर हात

मारा साटे मीठी

 

---०००---