ज्यांना पण यादव, अहिर किंवा गवळी असं समजतो त्यांच्या उपजातींच्या एकूण लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर भारताच्या 20% लोकसंख्या ही यादवांची किऺवा गवळ्यांची आहे. ही लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येचा विचार करता तीन टक्के एवढी आहे. यादव जात आपल्याला भारत,नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान ,बांगलादेश , रशिया आणि इतर जगाच्या काही भागात सापडते स्वतःला ते यदु राजाचे वंशज मानतात. आर्य ज्यांचा उल्लेख क्षत्रिय म्हणून सुद्धा झाला आहे . त्यांना पंचजन्य म्हणजे पाच लोक, जे वैदिक काळापासून क्षत्रिय जातीचे आहेत. यादव वैष्णवी परंपरा पाळणारे असून ते श्रीकृष्णाला आणि विष्णूला पुजतात. यादवाची क्षत्रिय म्हणून भारतात आणि नेपाळ मध्ये मुस्लिम येण्यापूर्वीची सत्ता होती. यादव, गवळी किंवा अहिर त्याच्या जाती आणि पोट जाती मधील सर्वात मोठे साम्य म्हणजे सर्वच स्वतःला यदुवंशाचे मानतात. सर्व कृष्णाची भक्ती करतात आणि तिसरी बाब म्हणजे सर्वांचा पारंपारिक उद्योग हा गुरे राखणे, दुग्ध पालन गुरे चारणे हाच होता. वैदिक वाङ्मयानुसार यदुवंशी आणि यादव हे यदूपासून जन्माला आलेले. यदु हा राजा ययातीचा पुत्र. त्याच वंशातला मधु ज्याने यमुना परिसरात मधुवन वर राज्य केलं, पुढे ते सौराष्ट्र आणि अंतरा म्हणजे गुजरात पर्यंत पसरत गेलं. त्याची पुत्री मधुमती हे हरीश जो इश्क जातीचा होता त्याच्याशी विवाह झाली त्यापासून यदुचा जन्म झाला आणि यादव हे या यदूचे वंशज मानतात. कृष्णाचा नंद ही याच वंशातील आणि त्याने सुद्धा मन परिसरात राज्य केले जरासंध मग त्याचा राजा हा कंसाचा सासरा, कंसाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने यादवांवर हल्ला चढवला. तेव्हा या दोन्ही मत लिहून द्वारकेला सिंधू नदीकाठी राज्य हलवल. वैदिक वाङ्मयातील यदु या राजाचा कृष्ण हा एकापूर्वज मानला जातो. आणि या संदर्भामध्ये यादव सुद्धा श्रीकृष्णाचे वंशज मानतात. अभ्यासानुसार यादवांचे जैविक गुण हे ब्राह्मण, कायस्तं आणि राजपूत त्यांच्याशीही जुळतात. काही इतिहासकार यादव आणि ज्यू यांच्याशी संबंध जोडताना आढळतात. रशियामध्ये सुद्धा यादव हे आडनाव आढळते. राजस्थानच्या 36 राजघराण्यातील यादीमध्ये अहिरांचा समावेश जेम्स टोड हा इतिहासकार करतो. आहे या शब्दासाठी समानार्थी शब्द हा यादव किंवा रावसाहेब मात्र रावसाहेब हा शब्द अहिरवार परिसरात दिल्ली परिसरातील काही भागांमध्ये हरियाणा आणि राजस्थान मधील अलवार जिल्ह्यामध्ये, काही खेड्यांमध्ये वापरला जातो. इसवी सन 1008 मध्ये झाशी जवळ अहिरवार अरोरा येथे अहिराणी राज्य स्थापन केलं आणि रुद्रमूर्ती हा आपला सैन्य दलाचा प्रमुख पुढे राजा होता. पुढे मधुरीपूत, ईश्वरसेन, शिवदत्त हे राजे होऊन गेलेत. पुढची यादव राजपूत म्हणून ओळखला जाऊ लागले पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश या भागात पसरले . ते स्वतःला यदूवशी शौरसेन, यदूवऺशी राजपूत यांचा वंशाचे समजत. यादव राजा हा कृष्णाचा आजोबा आणि पांडवांशी संबंधित. पंजाब मधील सैनिस यादव मथुरा सोडून पंजाब मध्ये स्थायिक झाले व इतरत्र पसरले. स्वतःला यदु कुळातील मानणारे अहिर उत्तर आणि दक्षिण भारतात तर घोष किंवा गवला किंवा सात गोपा हे बंदर आणि ओरिसामध्ये धनगर हे महाराष्ट्रात यादव आणि गुरुवार या आंध्रात कर्नाटकात ज्ञान आणि कोणार हे तामिळनाडूमध्ये हटवार आणि रावत हे मध्य प्रदेशात महाकूळ बिहारमध्ये आणि सर्व या जातींचा मुख्य व्यवसाय हा गोपालनाशी संबंधितच होता अहिर हे अभीर किंवा अभिरा म्हणून संबोधतात यदु आणि कृष्णाशी संबंधित आहे आणि यादवांशी आपला संबंध जोडतात म्हणून हे सारे यादव अहिर किंवा गवळी म्हणूनही ओळखले जातात.
खानदेश मध्ये अहीराची सत्ता होती त्यांना गवळी राज म्हणून ओळखले जायचे देवगिरीवर यादवांची सत्ता होती हे यादव म्हणजे अभीर किंवा अहिरच हे यदु आणी कृष्ण त्यांचे वंशज मानतात. घ्या यदु, कृष्णा किंवा यादवांचा उल्लेख महाभारताप्रमाणेच वात्सायनाच्या कामसूत्राची केला गेला आहे. या यादवांचं भारताच्या बाहेर सुद्धा नेपाळमध्येही राज्य होतं नेपाळ सारखा या डोंगरा भागात आठ यादव राजांनी राज्य केलं आहे अहिराऺना किंवा यादवांना काही भागात अभिर,अहिर, गोप किंवा गौला असेही संबोधलं गेलं आहे.
अलाहाबादचा समुद्रगुप्ताच्या शिलालेखावरून असं लक्षात येते की चौथ्या शतकात पश्चिम व दक्षिण भारतात अहिरांचा राज्य होतं. नाशिक नाही सापडलेल्या शिलालेखावरून चौथा शतकात अहिराणीचं राज्य होतं राजपूत आणि माळवा मध्ये सुद्धा अहिराणी राज्य होतं आठव्या शतकात गुजरात मध्ये काठी आलेत तेव्हाही बराचसा भाग अहिराणीच्या ताब्यात होता मिर्झापूरचा बराच भाग अहवाल नावाने ओळखला जायचा झाशी जवळचा भाग अहिरवार नावाने ओळखला जायचा हे नेपाळची राजे होते खानदेश आणि तापी खोरे या परिसरात अहिर राज्य होते देवगिरीला गौरी राजांचे राज्य होतं छिंदवाडा परिसरात गवळीचे राज्य होतं. सतराव्या शतकापर्यंत त्यांचं वर्चस्व बऱ्याच ठिकाणी होतं.
किलपट्टीकरम मध्ये अहिरपट्टी असा उल्लेख आढळतो. अईर या शब्दाचा अर्थ तामिळमध्ये गाय असा होतो. अईरपट्टी म्हणजे गुराख्यांची , गोपालकांची वस्ती. दक्षिण भारतात अहिरांचा वास्तव्य हे साधारणतः पहिल्या शतकात झाला आहे. पुढे राघव, रघुवंशी, सूर्यवंशी, यदुवंशी, चंद्रवंशी हे राजपुतांच्या उपशाखा गणल्या गेल्यात.
यादवांचा राज्यांचा विचार करता देवगिरीचे शिवना यादव शिवसेनेचे राज्य विदर्भातील यादवांचे राज्य द्वारकाच राज्य कोणतीच राज्य सौ राष्ट्राचे राज्य हे हे राजाचं राज्य निषेध राजा गवराजा खुश राजा शिर्डी राजा दर्शन राजा अवंती राजा माळावा राजा अनर्थ राजा येथे राजा विजय नगर मथुरा म्हैसूर नेपाळ जैसलमेर आणि मराठा राज्य
खानदेशातील अहिर , घाटातील गवळी आणि इतर भागात आढळणारे यादव हे सर्व एकच आहेत. यादव, गवळी किंवा अहिर या शब्दांचा प्रयोग पारंपारिक रित्या शेतकरी किंवा गुरे राखणारा या जातीशी संबंधित आहे. कालौघात सामाजिक आणि राजकीय उलथा पालथी होत असतात स्वतःला प्रतापी पौराणिक अशा राजा यदुचे वंशज मांडण्याचा ते दावा करतात.या चा उल्लेख हिंदु ग्रंथात महाभारत हरिवंश पुराणात विष्णुपुराण भागवत पूर्ण गरुड पुराणात इत्यादी ठिकाणी भरतो या ग्रंथामध्ये राजा यती आणि राणी देवयानी त्यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणून वर्णन केलं जातं. राजा यतीच्या पुढच्या पिढ्या यादव नावाने ओळखल्या जातात.असा यादव किंवा अहिर हे या नावाने ओळखले जाणारे पारंपारिक स्वरूपात यादव किंवा गवळी किंवा अहिर यांचा मुख्य व्यवसाय पशुपालनाचा.या औपचारिक जाती व्यवस्थेतून ते बाहेर होते. पुढे आपली सामाजिक प्रतिष्ठा सुधारण्याच्या दृष्टीने भारतीय आणि ब्रिटिश यांच्या सक्रिय भागीदारीत प्रतिष्ठित व्यवसाय सामील होण्याचा तसेच राजनीतीमध्ये सामील होण्याचा या बुद्धिजीवी आणि नेत्यांनी महाराज आणि गोपालक भगवान कृष्ण यांचे वंशज असल्याचा दावा करीत ते क्षत्रिय होते आणि यांच्या आधारावर अहिर गवळी किंवा यादव समुदाय स्वतःला क्षत्रिय असल्याचा दावा करतात. या संदर्भात विठ्ठल कृष्णाजी सचिन खेडकर या शिक्षकांनी यादवांच्या इतिहासावर काही प्रकाश टाकला आहे. यादवांचा किंवा अभिरांचा किंवा अभिरांचा किंवा गवळींचा हा समुदाय ज्याचा उल्लेख महाभारतात पुराणात राजवंश रूपामध्ये मानला गेला आहे . राबहादुर बालवीर यांच्या नेतृत्वात 1910 मध्ये अहिर यादव क्षत्रिय महासभा ची स्थापना करण्यात आली. तेव्हा ऊल्लेख करण्यात आला की महाराज यदु आणि भगवान श्रीकृष्ण यांचे ते वंशज आहेत आणि वर्ण व्यवस्थेमध्ये ते क्षत्रिय आहेत. यादवांच्या उपजाती पाहता अलग अलग नावांनी ओळखल्या जातात. त्याचं सामान्यतः कार्य गोपालक, गायी राखणं,दुग्ध व्यवसाय करणे. पंजाब आणि गुजरात मध्ये अहिर, गौला आणि महाराष्ट्र मध्ये गवळी, दक्षिण भारतात कर्नाटकात आंध्र प्रदेश मध्ये गौल्ला, तामिळनाडूमध्ये कोनर, केरळमध्ये मणियार या नावाने ते गवळी यादव किंवा अहिर ओळखले जातात. गोला, अहिर, गवळी, मनियार, नायर हे सर्व एकाच नावाची विविध समजली जातात . महाराष्ट्रातील विविध भागात हे गवळी पसरलेले आहेत. काही उपजाती मानल्या जातात. अहिर गवळी, धनगर गवळी,लिंगायत गवळी ,यादव गवळी. जरी एका व्यवसायात ते असले तरी अहिर यादव गवळी यांचे आपसात नाते संबंध आढळत नाहीत. मराठा, कुणबी, अहिर, गवळी, या महाराष्ट्र मधल्या जरी एकच जाती मानल्या गेल्या . परस्परामध्ये रोटी भेटी व्यवहार टाळताना दिसतात. हे मात्र खरे की सर्वत्र त्यांचा मुख्य व्यवसाय हा गोपालक, गुरे राखणे, चारणे आणि दुग्ध व्यवसाय करणे हाच होता. पुढे कालांतराने बदल होत गेला .सर्व क्षेत्रांमध्ये जसे शिक्षण, कला, प्रशासनिक सेवा किंवा सिनेमा, टेलिव्हिजन, खेळ, साहित्य, राजनीती इत्यादी क्षेत्रात अहिर, गवळी, यादव यांनी सहभाग नोंदवलेला आहे. हे यादव किंवा अहिर किंवा गवळी जातीचे लोक भारतातल्या सर्व राज्यांमध्ये आढळतात . जसे बिहार छत्तीसगड दिल्ली हरियाणा झारखंड कर्नाटक मध्य प्रदेशातील उडीसा राजस्थान उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी त्यांना ओबीसी ,आदर बॅकवर्ड क्लास , या श्रेणी सामील केला गेला आहे. मात्र महाराष्ट्रात यामध्ये कुणबी वेगळा करून कुणबी ओबीसी यामध्ये सामील करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील खानदेश या परिसरातअहिराऺची सर्वात मोठी संख्या आहे. लोकसंख्येचा विचार करता सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश बिहार हरियाणा या भागात आहेच याशिवाय नेपाळ आणि मॉरिशस मध्ये सुद्धा त्यांची संख्या आहे. पंजाब राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उडीसा झारखंड दिल्ली हिमाचल प्रदेश याही ठिकाणी त्यांची बऱ्यापैकी जनसंख्या आहे. 2011 च्या जनगणनेनुसार बिहारमध्ये 12 टक्के तर उत्तर प्रदेश यादव राज्य 15% जनसंख्या नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रात मात्र गवळी अहिर कुणबी मराठा या लोकसंख्येतील विभागली गेली आहे.
कर्नाटकातील लिंगायत हे वीरशैव मानतात. रत्नागिरीतील कुलाबा परिसरात ते महाराष्ट्रातील इतर गवळी , कुणबी किंवा मराठा या पेक्षा स्वतःला उच्च समजतात. रत्नागिरीतील गवळी समाजाचे विठ्ठल कृष्णाजी खेडकर यांनी 1924 साली अलाहाबादला ऑल इंडिया यादव महासभा गठित केली होती त्यात यादव गवळी मराठा अहिर हे एकच असल्याचे मांडले होते. मराठवाड्यात आणि तेलंगणाच्या काही भागात या मराठ्यांमध्ये किंवा गवळ्यांमध्ये यांच्या जीवन पद्धती आणि राहणीमान यानुसार नगरकर आणि वझरकर असे दोन गट आढळतात. नगरकर नगर परिसरात स्थायिक झालेले गवळी तर वझरकर डोंगर भाग असतात झालेले गवळी. वझरकर हा संस्कृत मधून निर्माण झालेला वृज म्हणजे गुरांचा गोठा यातून निर्माण झाला असावा. कोकणात कोकणातील गवळी म्हणजे आगारातले गवळी आणि घाटावरचे गवळी अशी पोटभेद दिसून येतात एक लिंगायत समाज त्यामध्ये ते गळ्यात लिंग वापरतात. ते स्वतःला मराठा, अहिर किंवा गवळी याहून श्रेष्ठ समजतात .त्यामध्ये दीक्षा वगैरे घेण्याचा प्रकार आहे. ते मांसाहार करीत नाहीत ते खंडोबा नागोबा तुळजापूर ची भवानी गणेश इतर हिंदू देवदेवतांची पूजा करतात.
धनगर गवळी त्यांना गवळी त्या गौला किंवा धनगर या नावाने महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकात ओळखतात .ते स्वतःला डांगे, मस्के अशा गटातही विभागतात. जंगल भ्रमंतीत चित्ता किंवा वाघ यापासून अधिक सुरक्षित असणाऱ्या म्हशीनचे ते पालन करतात. हटकर आणि गवळी हे आधी पारंपारिक एकच गटाचे मानले जातात. हे गवळी वेस्टर्न घाटातून चाफळ नानेगाव केळवण हिरेवाडी या मार्गाने स्थलांतरित झाले आणि हे स्थलांतर 15 व्या शतकात झाले असावे.
गोव्यामध्ये पूर्ती ठिकाणी गवळ्यांवर गुरं राखण्यासाठी गुरे चारण्याचा कर लावला होता आणि त्यांनी तो देण्यास नकार दिला कारण ते जंगलात राहत होते आणि विशेष म्हणजे त्याऺचा गवळ्यांवर राग असा होता की एकाही गवळीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला नव्हता. हे गवळी म्हसोबा विठोबा कडूबाई अंबाबाई बानाई कानोबा कृष्णा येलुबाई यल्लमा या देवतांना मानतात. बानाई ही खंडोबाची पत्नी ही गवळी होती .विठ्ठला्ला ते कन्नडीगा गवळी समजतात. पुराणातील
यदु पासून यादव किंवा अभिर वीर पासून अहिर, कृष्णाला मानणारे. यादव विठ्ठलाला मानताना आपला दर्जा उंचावण्यासाठी, श्रेष्ठ दाखवण्यासाठी पुन्हा विष्णू कृष्ण अशी पूजा करायला लागले.
वृद्ध प्रहर हा शेवटचा पूर्वज त्याने बरीच गुरु ढोरे सांभाळली होती आणि देवगिरी हा शेवटच्या ताब्यात बऱ्याच वेळा त्याला गवळी राजा धनगर गवळी असं नाशिक आणि खानदेश परिसरात संबोधले जायचं. शिवून यादव आणि हौसला यादव यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची देखरेख केली.
गवळी हा शब्द कोकणातील गवळी जातीशी वापरला गेला.मात्र अहिर हा शब्द खानदेशात असणाऱ्यांसाठी वापरला गेला. महाराष्ट्रातील गवळी किंवा अहिर यांची माहिती माणगावच्या विठ्ठल कृष्णाजी खेडेकर या शिक्षकांनी आपल्या पुस्तकात टाकली त्यावर कोकणातील गवळी लोकांच्या व्यवस्थेचा प्रभाव अधिक आहे. त्यात खानदेशातील अहिर समाजाचे चित्र दिसत नाही.
डॉ. रमेश सूर्यवंशी ,अभ्यासिका, वाणी मंगल कार्यालयासमोर, हिवरखेडा रोड , कन्नड. जिल्हा औरंगाबाद. महाराष्ट्र .संपर्क 94 21 43 22 18 किंवा 84 46 43 22 18
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा